रत्नागिरी:-शहरातील मुरुगवाडा येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल़ी. ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. असरार अस्लम मस्तान (26, ऱा मालगुंडकर चाळ, मुरूगवाडा रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास असरार याचा मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची खबर त्याच्या भावाने रत्नागिरी शहर पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.