खेड / प्रतिनिधी:-भरणे येथे आठवडाभरापूर्वी एका पेट्रोल पंपावर 500 रूपयांच्या तीन बनावट नोटा चलनात आल्याचा प्रकार पुढे आलेला असताना पुन्हा 100 रुपयंच्याही दोन बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भरणे येथील एका पेट्रोलपंपावर गर्दीचा फायदा उठवत 500 रूपयांच्या तीन बनावट नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. या नोटा नेमक्या कुठून आल्या, या शोध घेण्याचे काम सुरू असताना 100 रूपयांच्या बनावट नोटा सापडल्याने व्यापारी धास्तावले आहेत. 100 रुपयांची कलर झेरॉक्स असलेली नोट व अन्य एका नोटेवर तार नसल्याने या दोन्ही नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.