रत्नागिरी:-रत्नागिरी-करबुडे मार्गावरील फणसवळे फाटा येथे कार उलटून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर अन्य 3 जखमी झाल्याची घटना रविवारी 28 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. रजिया पठाण (65, ऱा मच्छीमार्केट रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जुबेर पठाण, रुक्सार पठाण व अन्य एक अशी जखमीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुबेर पठाण हे आपल्या ताब्यातील कार घेवून फणसवळे फाटा येथून जात होते. यावेळी कारमध्ये रजिया, रूक्सार व अन्य एक उपस्थित होते. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याकडेला उलटली. या अपघातात जुबेर, रजिया व रुक्सार यांना गंभीर दुखापत झाली त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे आणण्यात आले. यावेळी रजिया यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. तर अन्य तिघांवर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत..