खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ-खोपी फाटानजीक डंपरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
अरूण जैस्वाल (30, रा. शिवाजीनगर-नाचणेरोड, रत्नागिरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. एम.एच. 06 बी.डी. 0982 क्रमांकाचा डंपर चिपळूण दिशेकडून येथील रेल्वेस्थानकात सुरू असलेल्या अंतर्गत कामांसाठी लागणारे साहित्य घेवून येत असताना दुचाकीस्वाराला (एम.एच. 08 बी.बी. 5901) मागील चाकाखाली चिरडत फरफटत नेले. डंपरच्या मध्यभागी दुचाकीस्वार अडकून पडला. त्याच्या डोक्यात हेल्मेट असूनही त्याला प्राणास मुकावे लागले.
अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघात नेमका कोणाचा चुकीमुळे घडला. याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.