चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली गुहागरवासियांची मने
गुहागर- शिवकालीन युद्ध कलेचा समृद्ध वारसा जोपासण्याच्या उद्देशाने श्री दशभुज फाऊंडेशन व रत्नागिरी जिल्हा मर्दानी खेळ असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन युद्ध कलेचे व मर्दानी खेळांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन श्री देवश्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या मैदानावर करण्यात आले होते.या शिबिराचा शुभारंभ दिनांक १४ एप्रिल रोजी गुहागर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
या शिबिराचा सांगता समारंभ नुकताच रंगमंदिर गुहागर येथे संपन्न झाला त्यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित गुहागर वासियांची मने जिंकली. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष संतोष वरंडे, शिवतेज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड संकेत साळवी श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे गुहागर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मयुरेशजी पाटणकर रत्नागिरी जिल्हा हौशी ज्युडो संघटनेचे अध्यक्ष निलेशजी गोयथळे सामाजिक कार्यकर्ते प्रभूनाथ देवळेकर श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकरजी कांबळे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीराचे मुख्य संयोजक व दशभुज फाऊंडेशनचे संस्थापक बाबासाहेब राशिनकर मुख्य संयोजिका व प्रशिक्षिका सुलक्षणा राशिनकर प्रशिक्षक चिन्मय गुरव प्रा.विराज महाजन, भैरवनाथ धुमाळ शिक्षक वृंद पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी लाठी काठी, तलवारबाजी, सुरल, दांडपट्टा मानवी मनोरे याची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी तनया खानविलकर , स्वराज राशिनकर, हिंदवी घनवटे,निधिश साळवी, स्वराज घनवटे, शौनक दिक्षित,वरद भागवत, रिद्धी खानविलकर, ध्रुव राजपुत,जुई महाजन ,इंद्रवर्धन गोडगे, क्षितीज हलगरे, अरणी घाडे ,श्रेयस हलगरे, दत्तप्रसाद सांगळे, सई राशिनकर, ध्रुव धुमाळ, चैत्र साळवी,आदी शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते लाठी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले शिवकालीन युद्ध कलेचा समृद्ध वारसा जोपासण्याठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे संयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी संस्थेचे व मुख्य संयोजक बाबासाहेब राशिनकर व सुलक्षणा राशिनकर या दांपत्याचे विशेष कौतुक केले.