रत्नागिरी:-कोकण रेल्वेमार्गावर आठवड्यातून तीन दिवस धावणारी अतिरिक्त समर स्पेशल ट्रेन उद्या, दि. २६ एप्रिलपासून धावणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील थिवी दरम्यान ही गाडी ४ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे.
ही गाडी १७ एलएचबी डब्यांची असेल.
ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी (क्र. 01017) लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान दर शुक्रवार, रविवार, तसेच मंगळवारी धावेल. परतीच्या प्रवासात थिवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान ही गाडी (क्र. 01018) २७ एप्रिल ते ५ जून या कालावधीत शनिवार, सोमवार आणि बुधवारी धावणार आहे. दोन्ही दिशांनी मिळून ही गाडी ३६ फेऱ्या करणार आहे.
ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी थिवी स्थानकावरून सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, तसेच सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहे.