संगमेश्वर:- देवरुखमधील शतायुषी ग्रंथालय श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाचा २३ एप्रिल हा स्थापनादिन अत्यंत उत्साहात विविध कार्यक्रमानी संपन्न झाला. कार्यकारी मंडळ आणि कर्मचारी वृंद यांच्यावतीने श्री ग्रंथपूजा आणि श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ज्योती महिला मंडळाने भजन सादर केले.
सायंकाळच्या कार्यक्रमात कुमार शौर्य सचिन शिंदे, कुमारी वेदांती प्रदीप राव, कुमार विहंग योगेश फाटक आणि कुमार वरद चंद्रकिरण दांडेकर यांना ‘बालवाचक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. वाचनालयाच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती शीला श्रीराम हेगशेट्ये, श्री. आनंद विश्वनाथ जाधव आणि श्री. अरुण शंकर चौगुले यांना ‘ज्येष्ठ वाचक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
किर्तन आणि ज्योतिष या विषयात विशेष कार्य केलेल्या डॉ. श्री. दत्तात्रय वाडदेकर, दानशूर श्री. शरद कृष्णाजी राजवाडे, समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले श्री. निखिल कोळवणकर आणि पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार श्री. सुरेश सप्रे यांचा सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प आणि ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. कॅरम स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविलेल्या कुमार द्रोण मोहन हजारे याचा ग्रंथ, गुलाब पुष्प आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. राजाराम पंडित आणि श्री. अमेय पंडित यांनी ‘स्वरसंध्या’ हा गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयात स्थापना दिन उत्साहात संपन्न
