रत्नागिरी:-शहरातील बेलबाग येथे घरामध्ये 60 हजार रूपयांचा गुटखा-पानमसाला बाळगणाऱ्या संशयिताविरूद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा. सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापा टाकून ही कारवाई करण्यात आल़ी. रियाज इक्बाल मुन्सी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बेलबाग येथे घरातून गुटखा पानमसाल्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून छापा टाकून कारवाई करण्यात आल़ी. यावेळी संशयित आरोपी रियाज याच्या घरामध्ये पोलिसांना 60 हजार रूपयांचा गुटखा पानमसाला आढळून आल़ा. यामध्ये 21 हजार 780 रूपयांचा विमल केसरयुक्त पानमसाला, 3 हजार 338 रूपयांचा व्ही एक तंबाखु, 19 हजार 448 रुपयांचा विमल केसर युक्त जांभळ्या पाकिटमधील पानमसाला, 12 हजार रूपयांचा विमल इलायची पानमसाला आदी आढळून आल़े. याप्रकरणी पोलिसांनी रियाज याच्याविरूद्ध भादंवि कलम 328,272,273,188 अन्न सुरक्षा व माणके कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा.