दापोली:-दापोली तालुक्यातील कुंभवे पाटील वाडी येथील राजेंद्र लक्ष्मण हुमणे या 35 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना शनिवार 20 एप्रिल रोजी सकाळी 7:40 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र हुमणे याने 20 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान त्याच्या गावी घराचे बाहेरील झाडाला वायर बांधून त्या वायरने गळफास लावून घेतला. त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. त्यावर उपचार चालू असताना शनिवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 7:40 वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत झाल्याचे घोषित केले . दापोली पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुकाळे करीत आहेत.