वाटद कवठेवाडी शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न
खंडाळा : शाळेत येणारी मुलं ही आपल्या कौटुंबिक वातावरणापासून पहिल्यांदाच दूर आलेली असतात. त्यामुळे ती नवीन वातावरणात घाबरलेल्या मन:स्थितीत असतात. अशावेळी त्यांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी आणि त्यांच्या मनात शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन ती मुले शाळेत रममाण होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आईची ममता दिल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण आपलेसे वाटेल असा विश्वास रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राचे केंद्रियप्रमुख अरुण जाधव यांनी व्यक्त केला.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शाळेतील प्रत्येक मूल हे माझे आहे असे समजल्यास मुलांच्या उपस्थितीवर मोठा परिणाम होत असतो. ग्रामीण भागातील अनेक शाळा मोठ्या अडचणीवर मात करत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता देण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी शाळा पूर्व तयारी मेळावा हा उपयुक्त ठरणारा आहे. याद्वारे पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमता समजण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणारा असल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि प्रथम या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सध्या सर्वच जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना स्टार्स या उपक्रमातर्गत मोफत साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातील पहिला मेळावा वाटद कवठेवाडी शाळेत संपन्न झाला.
मेळाव्याच्या सुरुवातीला इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी शिक्षण आणि शिक्षण हक्क याबाबतच्या घोषणा देत विद्यार्थ्यांना मेळावास्थळाकडे अगदी उत्साहाच्या वातावरणात आणले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करत स्वागत करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीमध्ये दाखल करण्यापूर्वी आवश्यक क्षमता पडताळणीसाठी नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी आणि समुपदेशन असे सात स्टॉल उभारले होते. या सातही स्टॉल वर आवश्यक साहित्यासह स्वयंससेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. या मेळाव्यासाठी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी तयारी समजून घेत योग्य ते समुपदेशन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित वाटद केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पवार, कोंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक रमेश दुर्गवळी, खंडाळा शाळेचे मुख्याध्यापक विवेक नांदिवडेकर, रायवाडी शाळेचे मुख्याध्यापक शेखर सागवेकर, धोपटवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रावणी नांदिवडेकर, नीता शिर्के, रेश्मा कांबळे यांनी पालक, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केले.
शासनमान्य या पहिल्या शाळापूर्व मेळाव्याचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार आणि केंद्रप्रमुख अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे व सहकारी शिक्षक रेणुका धोपट यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षक आणि मान्यवर यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ विलास बारगुडे यांनी स्वागत केले.
तर मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वाती धनावडे, मनस्वी तांबटकर, सुमित्रा धनावडे, प्रिया तांबटकर, अक्षरा शिर्के, सुजाता लोहार, विजया तांबटकर, रुणाली तांबटकर, प्रविना धनावडे समिक्षा तांबटकर यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ यांनी मोठे सहकार्य केले.या मेळाव्यासाठी वाटद केंद्रातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत