आठ लाख फळांसाठी सुविधा देण्यासाठी तयारी
मुकुंद जोशी यांची माहिती
रत्नागिरी-ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा व शेतकऱ्याला हापूसच्या अस्सलतेमुळे चांगला दर मिळावा यासाठी आमच्या संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांना क्यू आर कोड शुल्क घेऊन वितरित करण्याचे ठरविले आहे. या वर्षी आता पर्यंत सव्वा लाख क्यू आर कोड शेतकरी बांधवांनी वापरले असल्याची माहिती कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे सचिव मुकुंदराव जोशी यांनी दिली.
ते म्हणाले हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख व पेटी अथवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख क्यू आर कोड चे टार्गेट ठेवले आहे. क्यू आर कोड तयार करून ते आमच्या संस्थेला पुरविण्यासंबंधी आणि ऍक्टिव्ह करण्यासंबंधी मीरो लॅब या कंपनीबरोबर करार केला आहे.
फळावर लावण्याचा क्यू आर कोड आमची संस्था 65 पैसे प्रति नग या दराने पूरवत असून बॉक्स वर लावण्यासाठी तीन रुपये दराने पुरवठा केला जात आहे व बागायतदारांना कोड ऍक्टिव्ह कसा करावा यासंबंधी प्रशिक्षणही दिले जात आहे
संस्थेची आर्थिक क्षमता एवढी सक्षम नसूनही जीआय नोंदणीतून येणाऱ्या प्रोसेसिंग चार्जेसच्या गंगाजळीतुन आमची संस्था प्रचार, प्रसार, कॅम्पस घेणे व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यक्रम राबवणे अशा गोष्टी करीत असते संस्थेकडून इतर कोणत्याही प्रकारचे खरेदी करणे विक्री करणे वगैरे व्यवहार नाही आहेत त्यामुळे संस्थेचे उत्पन्न मर्यादित आहे.
ते म्हणाले शासनाच्या एखाद्या स्कीम मधून जर संस्थेला अनुदान मिळू शकले तर संस्था आहे याच्यापेक्षा 10 पट वेगाने जीआय नोंदणीचा प्रसार करू शकेल व बागायतदारांना आणखीन कमी दरामध्ये मार्केटिंग साठी क्यू आर कोड पुरवू शकेल
संस्थेची स्वतःची वेबसाईट नेहमी अपडेट होत असते व त्यावर वेळोवेळी माहितीही पुरविली जाते
जोशी यांनी सांगितले की आमची संस्था कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी रजिस्टर केलेली असून त्यामध्ये पाचही जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी सभासद आहेत
याआधी सुमारे दोन वर्षापूर्वी आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून ही प्रक्रिया राबविण्यात आली होती परंतु त्यात त्यांना काही त्रुटीही जाणवल्या
उदाहरणार्थ क्यू आर कोड ला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो रियूज होण्याची शक्यता होती व त्याचा पुनर्वापर करून त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकत होता.
ते म्हणाले,यावर्षी निर्माण केलेल्या क्यू आर कोड मध्ये त्याची एक्सपायरी डेट आंबा पॅकिंग डेट आंबा परीपक्व होण्याची डेट हापूस आंबा बागायतदाराची डिटेल्स म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती त्यांचे मोबाईल नंबर ई-मेल ऍड्रेस वगैरे अनेक आवश्यक गोष्टी शेतकऱ्याला त्याच्या चांगल्या आंब्यामुळे ग्राहक सतत मिळत रहावा या दृष्टीने बारीक सारीक विचार विनिमय करून त्या सुधारणा करून घेतल्या गेल्या.
जर शासन स्तरावर वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून हापूस आंब्याच्या विक्रीच्या वेळी होणारी भेसळ रोखली गेली तर हापूस आंब्याला व बागायतदारांना सुखद दिवस येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.