उदय दणदणे/गुहागर:अनेकांच्या नवसाला पावणारी ,गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे श्रद्धास्थान,ग्रामदेवता श्री जाखमाता देवी मंदिर जीर्णोद्धार सोहळा दिनांक.२५,२६,२७ एप्रिल २०२४ रोजी संपन्न होणार असून “१०० वर्ष” अधिक परंपरा लाभलेल्या पुरातन काळातील ह्या मंदिराची नूतन वास्तू व्हावी अशी येथील ग्रामस्थांनी मनी इच्छा बाळगत “१३ जानेवारी २०१९” मध्ये मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प केला होता,ग्रामीण सह मुबंई,पुणे पातळीवर सदर मंदिराच्या संकलन निधी उभारण्याणीस सुरुवात होऊन, सदर उपक्रमाला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला, ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने,प्रयत्नातून व भाविकांच्या सढळ हस्ते मदतीने ग्रामदेवता श्री जाखमाता देवी मंदिराचे नूतन वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले असून अखेर येथील ग्रामस्थ जनतेने पाहिलेलं स्वप्न साकार झाले आहे.
गुरुवार,दिनांक २५ एप्रिल ते शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सदर मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न करण्याचे निश्चित झाले असून धार्मिक विधी सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सदर सोहळा संपन्न करण्याचे “सहकारी मित्र मंडळ”- निवोशी (भेलेवाडी) संलग्न:”श्री जाखमाता देवी मंदिर देवस्थान” वतीने जाहीर करण्यात आले आहे.
गुरुवार, दिनांक: २५ एप्रिल २०२४ रोजी,सकाळी ०७ ते दुपारी.०१ वा.धार्मिक विधी, दुपारी.०१ ते ०२.३० वा- महाप्रसाद, दुपारी.०३ ते ०६ वा- कलश मिरवणूक ( श्री दत्त मंदिर -पालशेत ते निवोशी -देवीची सहाण,ग्रामदेवी मंदिर,रात्रौ.०८ ते ०९ वा- दत्तप्रासादिक भजन मंडळ (पालशेत) यांचे सुस्वर भजन, रात्रौ-०९ ते १०.३० वा.महाप्रसाद
शुक्रवार, दिनांक: २६ एप्रिल २०२४ रोजी,सकाळी.०७ ते दुपारी .१२ वा-धार्मिक विधी, दुपारी.०१ ते ०३ वा.-महाप्रसाद दुपारी ०४ ते ०६ वा-महिलांचा हळदीकुंकू, रात्रौ.०८ ते १० वा- महाप्रसाद, रात्रौ.१०.३० वा.”सहकारी मित्र मंडळ” निवोशी (भेलेवाडी) यांचे कोकणची पारंपरिक लोककला-“नमन”,
शनिवार,दिनांक: २७ एप्रिल २०२४ रोजी.सकाळी.०७ ते ११ वा-श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी- ०१ ते ०३ वा-महाप्रसाद, दुपारी- ०४ ते ०६ वा- प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार समारंभ, रात्रौ- ०७ ते १० महाप्रसाद, रात्रौ-०९ ते १०- श्री सोमेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ (पोमेंडी ) यांचे सुस्वर भजन, रात्रौ.१० वा.कोकणची लोककला (जाखडी नृत्य) शक्ती-तुराचा जंगी सामना,अशा विविध कार्यक्रमांनी हा जीर्णोद्धार सोहळा संपन्न होणार असून श्री जाखमाता देवी मंदिर कलशारोहन व जीर्णोद्धार सोहळ्याला तमाम भाविक, भक्तगणांनी,सदर जीर्णोद्धार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून ग्रामदेवी दर्शनासह,महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकारी मित्र मंडळ निवोशी (भेलेवाडी) संलग्न “श्री जाखमाता देवी मंदिर देवस्थान” वतीने करण्यात आले आहे.