चिपळूण:- कोणत्या ना कोणत्या कारणातून फिरायला घेऊन जाऊन अल्पवयीन भाचीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मामीसह एका तरुणाला अटक करण्यात आली होती.
सोमवारी त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिजित पांडुरंग पवार (25, खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन भाचीला वेगवेगळी आमिषे दाखवून मामी तिला चिपळूण, रत्नागिरी, खेड, लोणावळा येथे फिरायला घेऊन जात असे.
यावेळी तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असे पीडित तरुणी पोलीस स्थानकात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी मामीसह खेड तालुक्यातील अभिजित पवार याला अटक केली होती. सोमवारी त्या दोघांना येथील न्यायालयात हजर केले असताना त्या दोघांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करत आहेत.