चिपळूण:-खेळण्यासाठी दिलेल्या रिमोट कंट्रोलची बॅटरी एक वर्षाच्या बाळाने गिळल्याची घटना घडली होती. बाळाच्या तोंडातून रडण्याचा घोगरा आवाज आणि डोळ्यातून अश्रु वाहत होते. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या आई-वडिलांनी त्या बाळाला चिपळूण शहरातील अपरांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टराच्या अथक परिश्राने त्या बाळावर शस्त्रकिया करण्यात आली. अखेर गिळलेली रिमोट कंट्रोलची बॅटरी तोंडातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. चिपळुणातील अपरांत हॉस्पिटलने केलेल्या या अवघड शस्त्रक्रियेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहेत.
उपचारासाठी त्या बाळाला अपरांत हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि सुप्रसिद्ध इ एन टी सर्जन डॉ. यशवंत देशमुख यांना संपर्क साधण्यात आला. अशा प्रकरणासाठी विशेषतः लहान मुलांसाठी नेहमीच अत्यंत तत्परतेने येतात. हातातील पूर्वनियोजित असलेली केस रद्द करून देशमुख लगबगीने हॉस्पिटलमध्ये आले. बाळाच्या शस्त्रक्रीयेची तयारी झाली. ओ.टी, भुलतज्ञ, इन्स्ट्रुमेंट, सगळे अगदी वेगाने दाखल झाले. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या लगबगीमध्ये बाळाची काळजी व्यक्त होत होती. संपूर्ण टीम शस्त्रक्रिया थिएटरमध्ये दाखल झाली. आता बाळाला नेमकं काय झाल हे पुढे येणार होते.
त्या बाळाला खेळण्यासाठी खेळणी दिली होती. त्यामधील एका खेळण्याचा रिमोट कंट्रोलची बॅटरी बाहेर आली होती. चकाकणारी ती वस्तू त्या बाळाने गिळली होती. त्या बॅटरीमध्ये कार्बन मोनोफ्लोराईड, कौपर, मग्निज डाय- ऑक्साईड, व मर्क्युरीक असिड यासारख्या घातक रसायनांनी बनलेली बॅटरी शरीरातील लाळ आणि ती रसायने यांचा संयोग झाला की ती अवघ्या दोन तासातच गंजायला सुरुवात होते. त्यामधील द्रव बाहेर येते. परिणामी अन्ननलिकेला छिद्र पडून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. बाळाने ती बॅटरी गिळून चार तास होऊन गेले होते. यातून फार मोठा धोका निर्माण झाला होता. बॅटरी श्वसन नलिका आणि अन्न नलिका यांच्या जवळ होती. ती पुढे अन्न मालिकेद्वारे जठरामध्ये जाऊन बालकाच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. बाळाला जनरल अनस्थशिया देण्यात आला. डॉ. यशवंत देशमुख यांनी आपल्या अनुभव आणि कौशल्याची प्रचिती देत esophagoscope आणि मागील forceps च्या सहाय्याने अखेर ती बॅटरी बाहेर काढली. डॉ. देशमुख आणि त्यांच्या टीमने बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्यापूर्ण केली. बाळाची भूल उतरली आणि त्याचा रडण्याचा स्पष्ट आवाज येताच त्या आई-वडीलाचे आनंदाअश्रू बाहेर आले. त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.