राजापूर:-ऐन शिमगोत्सवात प्रकटलेल्या राजापूरच्या गंगेवर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे . गंगास्नानाची पर्वणी साधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक येत असतानाच रविवारी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसाद खांडेकर यानी सहकुटुंब गंगास्नान करत राजापूरच्या गंगामाइचे दर्शन घेतले .
गत आठवड्यात ज्येष्ठ मराठी साहित्यिक व प्रसिध्द कवी अशोक नायगावकर यानी सहकुटुंब राजापूरच्या गंगेवर येत गंगास्नानाचा लाभ घेतला होता व राजापूरच्या गंगामाइचे दर्शन घेतले होते . त्यानंतर रविवारी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसिध्द कलाकार प्रसाद खांडेकर यानी आपली आइ , पत्नी , मुलगा , मुलगी व भाचा यांच्यासह राजापूरच्या गंगेवर येत गंगास्नान केले व राजापूरच्या गंगामाइचे दर्श्न घेतले आहे .
राजापूरच्या गंगामाइची ख्याती अनादी काळापासुन सर्वदुर पसरलेली आहे . दर तीन वर्षानी प्रकट होणाऱ्या राजापूरच्या गंगेवर ऐतिहासिक काळातही अनेक राजे , साहित्यिक यानी भेटी दिल्याच्या नोंदी आहेत . छत्रपती शिवाजी महाराज यानीही राजापूरच्या गंगेवर येत गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत . या वर्षी राजापूरच्या गंगेचे होळी पौर्णिमेच्या दिवशीच आगमन झाले . त्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकानी गंगास्नानाची पर्वणी साधली आहे . या महिण्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टी सुरु होणार आहे . त्यामुळे यावर्षी गंगास्नानासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे .