रत्नागिरी:-शहरातील जेल रोड येथे असलेल्या बीएसएनएल कार्यालयाच्या ग्राऊंडफ्लोअरचे पॅसेजमधून 1 लाख 7 हजार रूपये किमतीची कॉपर केबल चोरीला गेल़ी. ही घटना 6 ते 8 फेबुवारी 2024 या दरम्यानच्या काळात घडल़ी. नंदकिशोर गुणाजी कदम यांनी याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेलरोड येथील बीएसएनएलच्या कार्यालयातील ग्राऊंडफ्लोअरच्या पॅसेजमध्ये डीसी पॉवर कॉपर केबलची बंडले ठेवण्यात आली होत़ी. 6 ते 8 एपिल 2024 या काळात यातील 4 बंडले अज्ञाताने लांबविल़ी अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आह़े.