राजापूर:-राष्ट्र सेवा दलाचे दस्त नायक शिबिर येत्या २६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत ओणी येथे होणार आहे.
शाखा, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, कमल मोहन ट्रस्ट आणि वात्सल्य मंदिरातर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आले असून ते ओणी येथील नूतन विद्या मंदिराच्या प्रांगणत होणार आहे. शिबिरत १० ते २० वर्षे वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. शिबिराचे शुल्क ३०० रुपये आहे.
शिबिरात सहभागी होताना विद्यार्थ्यांनी जेवणाचे ताट, वाटी, पेला, ग्लास, अल्पोपाहारासाठी डिश, अंथरूण – पांघरूण, चादर, दिवसभर घालण्यासाठी चांगले कपडे, मैदानी खेळांसाठी स्वतंत्र कपडे, चर्चासत्रातील नोंदी ठेवण्यासाठी वही व पेन, आवश्यक औषधे, गोळ्या सोबत आणाव्यात. मोबाइल, पैसे, चैनीच्या वस्तू, सोन्याचे दागिने सोबत आणू नयेत.
शिबिराचा परिसर संरक्षणयुक्त आहे. संयोजकांशी संपर्क साधून मुलांशी संवाद साधता येऊ शकेल. अखेरच्या दिवशी, ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिबिराच्या ठिकाणी समारोप कार्यक्रमात पालकांनी सहभागी व्हायचे आहे.
शिबिराविषयी अधिक माहिती संयोजक डॉ. महेंद्र मोहन (अध्यक्ष, वात्सल्य मंदिर, ओणी – ९४२३८०४९२७), रूपेश गी. रा. (सचिव, वात्सल्य मंदिर, ओणी – ०८६५२०६७८८८), नितिन मुझुमदार (शिबिर संयोजक – ८६६८३६५६२३), आलोक मोहन (शिबिर संयोजक – ९०९६५०५९६०) किंवा सहनिमंत्रक महेशकुमार (९७६३५७२०१५), बी. के. गोंडाळ (९५२९९८००७७) किंवा सरिता पवार (९६०४६५५८४४) यांच्याशी संपर्क साधावा.