रत्नागिरी:-जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून भाटीमिऱ्या येथे जायंटस् ग्रुप ऑफ रत्नागिरी, पिंपळवाडी बागकर मंडळ, भाटीमिऱ्या आणि पी. के. ज्युपिटर हॉस्पिटल (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यात ८० जणांची तपासणी करण्यात आली.
हाडांचा ठिसूळपणा, रक्तदाब, मधुमेह तसेच इतर सर्वसाधारण तपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती सर्व सहभागी ग्रामस्थांना मोफत औषधे देण्यात आली.
ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. सतीश पाटील, डॉ. अभिजित गुणे, डॉ. नीलेश करपे, डॉ. प्रवीण कारंडे आणि डॉ. विठ्ठल पाटील हे सर्व तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य तपासणी कार्यक्रमास उपस्थित होते.
पिंपळवाडी बागकर मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच जायंटस् रत्नागिरीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भुते, माजी अध्यक्ष विनय जोशी, सदस्य डॉ. मिलिंद सावंत, संजय पाटणकर, योगेश पटवर्धन, डॉ. प्रसन्न मुळ्ये, महेश शेवडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.