रत्नागिरी:-तालुक्यातील गावडे आंबेरे येथे फिट येऊन खाडीच्या पाण्यात पडल्याने महिलेचा मृत्यू झाल़ा. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडल़ी. मंजिरी महेश धानबा (38, ऱा गावडे आंबेरे) असे मृत महिलेचे नाव आह़े. या घटनेची नोंद पूर्णगड पोलिसात करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजिरी यांना फिट येण्याचा आजार होत़ा. 7 एप्रिल रोजी त्या काही कामानिमित्त खाडीकिनारी गेल्या होत्य़ा. यावेळी त्यांना फिट आल्याने त्या खाडीच्या पाण्यात पडल्य़ा. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह खाडीच्या पाण्यामध्ये स्थानिक रहिवाशांना आढळून आल़ा अशी नोंद पूर्णगड पोलिसांत करण्यात आल़ी. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गावडे आंबेरे येथे फिट येऊन खाडीत पडल्याने महिलेचा मृत्यू
