मुंबई:-लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या दरम्यान निवडणुक आगोयातर्फे निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आहे. यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर शिट्टी चिन्ह, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून, तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत.
दुसरीकडे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून अमरावती मतदारसंघातून शड्डू ठोकलेल्या दिनेश बूब यांनाही शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आहे. इंडियन नॅशनल लीगचे उमेदवार नजीब शेख यांना गॅस सिलेंडर चिन्ह देण्यात आले आहे.
जानकर यांनी पहिल्या पसंतीच चिन्ह म्हणून शिट्टी, दुसऱ्या पसंतीला सफरचंद, तर रोड रोलर या चिन्हाला तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली होती. मात्र निवडणूक आयोगाने जानकर यांना पहिल्या पसंतीच शिट्टी हे चिन्ह दिले आहे. दरम्यान वंचितकडून ‘गॅस सिलिंडर’ पहिली पसंती, दुसरी प्रेशर कुकर तर तिसऱ्या पसंतीला पर्याय हा ‘रोड रोलर’ चिन्हाची मागणी होती. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि इंडियन नॅशनल लीगचे उमेदवार नजीब शेख या दोघांनीही गॅस सिलेंडर चिन्हाची मागणी केली होती. मात्र लकी ड्रॉ पद्धतीने नजीब शेख यांना गॅस सिलेंडर चिन्ह, तर आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला प्रेशर कुकर ही निशाणी मिळाली आहे.
जानकरांना शिट्टी,प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर निवडणूक चिन्ह
