रत्नागिरी:-उंबर्डे (पेण, रायगड) येथील हिराबाई गावंड फाउंडेशन व येथील अ. के. देसाई हायस्कूलतर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत ७० विद्यार्थ्यांनी दोन हजारावर सूर्यनमस्कार घातले.
स्पर्धेच्या उद्घाटनाला डॉ. स्वाती पाटील, श्रीमती शेलार, सचिन सावंत देसाई, हिराबाई गावंड फाउंडेशनचे नरेंद्र गावंड, सचिव ज्योती गावंड, देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी, तेजल चव्हाण, केतकी जोशी-परांजपे उपस्थित होते.
स्पर्धेसाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात आला होता. स्पर्धेत एका संघात सात शाळांकडून प्रत्येकी १० विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षकांनी सूर्यनमस्कारांचे परीक्षण करून निकाल जाहीर केला. विजेत्यांना हिराबाई गावंड फाउंडेशनतर्फे सन्मानचिन्ह व पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गोपाळ चौधरी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
स्पर्धेचा निकाल असा : सांघिक – मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कुवारबाव, महालक्ष्मी विद्यामंदिर, खेडशी, सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय. वैयक्तिक स्पर्धा- मुले – मानस आंब्रे (एम. के. व्ही. इंग्लिश मीडियम स्कूल), मल्लेश गुरव (श्री महालक्ष्मी विद्यामंदिर, खेडशी), सूरज पाल (देसाई हायस्कूल). मुली – किंजल गायकवाड (सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय), स्वराली रसाळ (एम. के. व्ही. इंग्लिश मीडियम स्कूल), महेश मुल्ला (देसाई स्कूल, रत्नागिरी).
रत्नागिरीत 70 विद्यार्थ्यांनी घातले 2 हजार सूर्यनमस्कार
