लांजा:-अचानकपणे लागलेल्या वणव्यात शेकडो काजू कलमे होरपळल्याने लाखो रुपयांचे नुकसान होण्याची घटना लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील प्रभानवल्ली नांगरफळेवाडी येथे नुकतीच घडली आहे
गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये वणवे लागून शेकडो एकर वरील आंबा काजू कलमे यांच्या बागांचे मोठे नुकसान होत आहे .अशाच प्रकारे प्रभानवल्ली नांगरफळेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास लागलेल्या वणव्यात येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अंकुश गंगाराम कोलापटे यांची २०० काजू कलमे आणि पन्नास बांबू तर मंगेश राजाराम जाधव यांची १५० ते २०० काजू कलमे, सुभाष शांताराम पालांडे यांची ६० ते ७० काजू कलमे, रामचंद्र काशीराम पालांडे यांची ५० ते ६० काजू कलमे अशा प्रकारे काजू कलमे होरपळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा पंचनामा कृषी अधिकारी कृष्णा पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. वणव्यामुळे ही आग लागून शेकडो काजू कलमे ही भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काजू हंगामात हे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.