राजापूर:-केंद्रीय मंत्री नारायण राणे आज, दि. ६ एप्रिल रोजी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. याप्रसंग नारायण राणे हे राजापूर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राणे राजापुरात येत असल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता ओणी येथील साई विमलेश्वर मंगल कार्यालयात श्री. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत.
यावे॓ळी भाजपाचे सर्व कार्यकर्ते, बेसिक आणि सर्व मोर्चे पदाधिकारी तसेच बूथ अध्यक्ष, सहबूथ अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, शक्तिकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे राजापूर तालुकाध्यक्ष सुरेश गुरव व भास्कर सुतार यांनी केले आहे.