संगमेश्वर/प्रतिनिधी:-
संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये येथील एका शाळेत गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारल्याने दुखापत झाल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे केली आहे. या मारहाणीत त्या विद्यार्थ्याच्या कानाला आणि डोळ्याला दुखापत झाल्याचा आरोप मारहाण झालेल्या विद्यार्थ्याया पालकांनी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार सदर विद्यार्थी तिसरीत शिकत असून तो 4 एप्रिलला शाळेत गेला होता. त्यावेळी शिक्षिकेने त्याला गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून हाताने मारहाण केली. यात त्याच्या कानाला व डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार करावे लागले.
या शिक्षिकेबाबत यापूर्वीही मुलांच्या व पालकांच्या तक्रारी असून ग्रामस्थांसमोर सदर शिक्षिकेला समज देण्यात आली होती. आपल्याला न्याय मिळत नाही तो पर्यंत आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाही. यामुळे होणाऱया शैक्षणिक नुकसानीला सदर शिक्षिका जबाबदार राहतील, असेही निवेदनात म्हटले आहे.
संगमेश्वरात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण, कानाला डोळ्याला दुखापत
