चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारी ऍपे पिकअप कळंबस्ते येथे रस्त्यालगत खोलगट भागात कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. यात कोणीही जखमी झाले नसून ही गाडी एका गॅरेज व्यावसायिकाची असल्याची माहिती पुढे येत आहे.
ऍपे पिकअप चालक वालोपेहून सायंकाळी निघाला होता. तो कळंबस्ते येथे आल्यानंतर गाडी रस्त्यालगत खोलगट भागात कोसळून दगडावर आदळली. यामुळे पिकअपची चाके निखळली. अपघातात ऍपे पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते येथे ऍपे पिकअप उलटी
