रत्नागिरी:-विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आक्षेपार्ह व्हिडिओ बनविल्याचा आरोप असलेल्या ताणाला गावारी रात्री ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी. कौस्तुभ आदिनाथ वेल्हाळ (27, ऱा पाली बाजारपेठ ) असे संशयित ताणाचे नाव आह़े. कौस्तुभ याला शुकवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल़ी.
गुन्ह्यातील माहितीनुसार पीडित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून कौस्तुभ याने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल़े. तसेच पीडितेला ब्लॅकमेल करत पैशाची मागणी करत होत़ा, अशी तक्रार पीडितेकडून दाखल केली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी कौस्तुभ याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा, मात्र, अटकेच्या भीतीने कौस्तुभ याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होत़ा. न्यायालयाने कौस्तुभ याचा अर्ज फेटाळून लावल़ा. यानंतर ग्रामीण पोलिसांकडून कौस्तुभ याला गावारी अटक करण्यात आल़ी तसेच न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े.
विवाहितेच्या आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी अखेर पालीच्या युवकाला अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी
