खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज-शिवफाटा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दुपारी सुमारास 40 हजार रुपयेही किमतीचा गांजा व दुचाकी असा दीड लाख रुपये किमतिचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी पथकाने तिघांना जेरबंद केले आहे. गांजा विक्री प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आले असून मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिघांकडून चार मोबाईलही जप्त करण्यात आले असून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
मोहन शिवशंकर कुशवाहा, शुभम संतोष गमरे, सािान रामसहजीवन चौहान अशी गजाआड केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेजण दुचाकीवरून पुणे-स्वारगेट येथून एका व्यक्तीकडून गांजा खरेदी करून येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली. त्यानुसार महामार्गावरील बोरज-शिवफाटा येथे सापळा राला असता दाकीवरून (एमएच-08/एआर-8127) येणाऱ्या तिघांना गांजासह रंगेहाथ पकडण्यात आले.
एका संशयिताया बॅगेत 2.011 ग्रॅम वजनाचे व 40 हजार 220 रुपये किमतिचा गांजा आढळला. तिघींही झाडाझडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे असलेले चार मोबाईल पथकाने हस्तगत केले. हा गांजा पुणे येथील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आले असून त्या दृष्टीने पुणे येथील त्या व्यक्ताही पथकाकडून शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.