रत्नागिरी:-तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथे किरकोळ वादातून सख्ख्या भावांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. मारहाणीत दोघे भाऊ जखमी झाल़े. अजित अशोक बारगोडे व आशिष अशोक बारगोडे (ऱा कोतवडे रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत़. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा.
मंगेश शांताराम बारगोडे व मनोज मंगेश बारगोडे (ऱा कोतवडे रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजित बारगोडे हे 3 एपिल 2024 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जेवण करून अंगणामध्ये शतपावली करत होत़े. यावेळी शेजारील पाकाडीमध्ये जोरजोराने भांडण होत असल्याचा आवाज अजित यांना आल़ा. हे भांडण सोडविण्यासाठी अजित हे गेले होत़े.
यावेळी संशयित आरोपी यांनी अजित व आशिष बारगोडे दगडाने मारहाण केल़ी अशी तक्रार अजित बारगोडे यांनी केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी यांच्याविरूद्ध भादंवि कलम 323,324 व 504 प्रमाणे गुन्हा दाखल केल़ा. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांना मारहाण
