( चिपळूण )
दिव्यांग पतीला शिवीगाळ केल्याप्रकरणी पत्नी, तसेच धमकी देणाऱ्या मेव्हण्यावर मंगळवारी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार तालुक्यातील काविळतळी येथे घडला.
नयना नागेश भुवड व कुलदीप दौलत दोनाडकर (लाखणदूर-भंडारा) असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नी व मेव्हण्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नागेश दत्ताराम भुवड (32, काविळतळी) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून ते 25 ऑगस्ट 2022 दरम्यान नागेश भुवडला कोरोनामुळे दिव्यांगत्व आले. त्यानंतर त्याची पत्नी नयना ही त्या मानसिक, शारीरिक छळ करून समाजामध्ये अपतिष्ठा करुन शिवीगाळ करत असे. तसेच त्या मेव्हणा कुलदीप दोनाडकर याने नागेश याला मेसेज करुन धमकी देत असे. या पकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
