कुडाळमध्ये भाजपची संघटनात्मक आढावा बैठक
कुडाळ:-भाजपचे सिंधुदुर्गातील कार्यकर्ते निष्ठावंत आहेत असे मी सगळ्यांना सांगतो. तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणे करू नका.
नांदा सौख्यभरे ! असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. राणे बोलत होते.
भाजपच्या या संघटनात्मक आढावा बैठकीची सुरुवात नेत्यांच्या प्रतिमान अभिवादन करून झाली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे आमदार नितेश राणे, कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघ प्रमुख निलेश राणे, कोकण विभाग प्रमुख शैलेंद्र दळवी, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, राजन तेली, बाळासाहेब माने, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अशोक सावंत, दत्ता सामंत, रणजित देसाई, श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे. महेश सारंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले, हा मेळावा पक्ष हितासाठी आहे. मोदीजींनी कार्यकर्त्यांना जी हाक दिलीय, अबकी बार चारसो पारचा जो संकल्प आहे, तो पूर्ण करण्यासाठी हा मेळावा आहे. आपले काम लोकहिताचे होते की नाही ते या निवडणुकीत कळणार आहे. मी आताच कोअर कमिटीची बैठक अटेंड करून आलोय. सिंधुदुर्गातील कार्यकर्ते निष्ठावंत आहेत असे मी सगळ्यांना सांगतो. तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणे करू नका. नांदा सौख्यभरे ! असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.
श्री. राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. अजून महायुतीचा उमेदवार जाहीर व्हायचा आहे, तरी का घाबरता एवढे? अस सवाल राणे यांनी महाविकास आघाडीला केला. केला. 1989 नंतर जिल्ह्यत विकासाचा कोणता प्रकलप विरोधकांनी आणला, ते सांगा, असे विचारून नारायण राणे यांनी . शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार वैभव नाईक याच्यावर देखील त्यांनी टीका केली. बौद्धिक आणि विकासात्मक बोला. कणकवलीचा एक माणूस केंद्रात मंत्री आहे याचे विरोधकांना आणि पत्रकारांना कौतुक नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दोडामार्ग मध्ये वैद्यकीय साहित्याचे ५०० कारखाने आणायचे आहेत. ओरोस मध्ये एमएसएमइचे ट्रेनिंग सेन्टर होणार आहे. त्यातील प्रशिक्षित युवकांना दोडामार्ग मधील या कारखान्यात रोजगार मिळेल. मी नवीन रोजगार देणारे उद्योग सुरू केले तर विरोधकानी टीका करण्याचे उद्योग सुरू केले, असे राणे म्हणाले. विद्यमान खासदार विनायक राऊत म्हणजे शेतातले बुजगावणे असल्याची टीका राणे यांनी केली. काही झाले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचाच खासदार असेल असे राणे यांनी ठामपणे सांगताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एका सुरात होकार भरत त्यांना प्रतिसाद दिला.
कोणाला गणपती बनवावे कोणाला हनुमान बनवावे हे कार्यकर्त्यांच्या हातात आहे. तुम्ही माझे सवंगडी आहात. मला तुमचा अभिमान आहे. भाजप आणि मोदींचे कार्य या जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत घेऊन जा, असे आवाहन श्री. राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.
कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत औषधाचा घोटाळा उबाठाच्या नेत्यांनी केला, असा आरोप नारायण राणे यांनी करत या प्रकरणी लवकरच दोघेही बाप बेटे जेल मध्ये जातील असे सांगितले. लोकांपर्यंत जा. मोदींना मत द्या. मोदींमुळे भारत विकसित देश होणार आहे. त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी, अबकी बार चारसो पारसाठी येथे भाजपचा खासदार हवा असे राणे यांनी शेवटी सांगितले.
जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आवश्यक आहे, हे आपण घरोघरी जाऊन सांगूया. प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे. स्वतः उमेदवार असल्यासरखे प्रयत्न करा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपची ताकद आहे. प्रत्येक बुथवर एनडीएच्या उमेदवाराला ७० ते ८० टक्के पेक्षा जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करा. या डबल इंजिनच्या सरकारमधून सामान्य माणसाच्या झालेला फायदा लोकांपर्यंतपोहचवा आजच विजयाचा संकल्प करा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
यावेळी बोलताना माजी आमदार प्रमोद जठार यांनी सहाही विधानसभा मतदार संघात १ लाखापेक्षा जास्त मतदान भाजपला होईल आणि अडीज लाखापेक्षा जास्त मदधिक्याने महायुतीचा उमेदवार येथून निवडणून येईल असा विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांची अवस्था पुराणे जोमाने के जेलर सारखी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीत काही जण रागावले असतील, रुसलेले असतील तर त्यांच्याकडे गुलाबाचे फुल घेऊन जाऊ असेही श्री. जठार म्हणाले. गेल्या ५०-६० वर्षात काँग्रेसने देशासमोर निर्माण केलेले प्रश्न सोडविण्याचे काम मोदी सरकारने केल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.
संघटनेचे काम करताना विरोधकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मी तीनदा लोकसभा लढवली. दोन वेळा मत कमी पडली. तशी वेळ यावेळी येऊ देऊ नका, असे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी केले. मागच्या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी काहीही केले नाही याची चर्चा लोकांमध्ये झाली पाहिजे. एक तरी विषय या विद्यमान खासदारांनी पूर्ण केला का? एक तरी प्रश्न सोडवला का, असा प्रश्न निलेश राणे यांनी विचारला. हे खासदार काही करू शकले नाहीत. मतदारसंघात काय चालले याची दिल्लीत माहितीही नाही, अशी टीका निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केली. लोकसभेत दमदार माणूस पाठवायचा आहे. लोकसभेत बाजापेटी वाजवून चालत नाही. असा मिश्किल टोलासुद्धा निलेश राणे यांनी विनायक राऊत याना लगावला.
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, ५१ टक्के मतदान आपल्याला मिळवायचे आहे. त्या दृष्टिकोनातून आपण तयारी केलेली आहे. आपल्या उद्दिष्टानुसार आपण नियोजन केले पाहिजे. तुमच्या जबाबदाऱ्यांच्या अनुसार तुम्हाला आता पावले टाकण्याची वेळ आलेली आहे. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी यावेळी केले. निवडणूकीत कोणतेही गालबोट लागता नये. वाद वाढतील कसे, यावर विरोधकांची रणनीती ठरलेली आहे. तिकडे लक्ष देऊ नका. आपल्या बुथचे मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करा. महायुतीच्या उमेदवाराला पहिल्या पाचातले मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार करूया असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी यावेळीं केले.
वातावरण कसे दूषित होईल हेच विरिधक बघत आहेत। तुम्ही फक्त तुमचा बूथ सांभाळा, असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले. ९१८ बूथ आणि त्यावर प्रत्येकी ३ हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास तेली यानी व्यक्त केला.