रत्नागिरी:-शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर सर्कल जवळील आंब्याच्या झाडाखाली अज्ञाताने उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याचे बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास दिसून आले. यामध्ये दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, मारुती मंदिर सर्कल जवळ ट्रॅफिक पोलीस उभे राहतात त्या ठिकाणी नेहमी रात्रीच्या वेळी दुचाकी उभ्या करून ठेवलेल्या असतात. मात्र बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने आंब्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या दोन दुचाकीची तोडफोड केली. उभ्या गाड्याना जोरदार धक्का देऊन पाडण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन्ही गाड्यांची आरसे आणि दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी एकूण 4 दुचाकी उभ्या होत्या. मात्र यातील दोनच दुचाकी अज्ञाताकडून पाडण्यात आल्या आहेत. अन्य दोन सुरक्षित आहेत. उभ्या असलेल्या या गाड्यावर कुणीतरी रागाच्या हेतून पाडल्या असाव्यात असे बोलले जात आहे. मात्र गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या प्रकाराने आश्चर्य व्यक्त होत आहे.