चिपळूण: भारत शासनाच्या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने माहे जानेवारी २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचालित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून त्यांची निवड जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे झाली आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या गार्गी घनश्याम घडशी, वरद अभय गोखले, स्वरांगी पांडुरंग पाटील व आदेश कुंडलिक सांगडे यांनी यश प्राप्त करून जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे प्रवेश निश्चित केला आहे.
या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सुरेन्द्र अवघडे, सुधीर कदम व समीक्षा बागवे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम,सचिव महेश महाडिक ज्येष्ठ संचालक व शालेय समिती चेअरमन शांताराम खानविलकर, संस्था पदाधिकारी, पालक व विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
सावर्डे विद्यालयाचे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत सुयश
