मुंबई-सुदर्शन जाधव:-हौशी रंगभूमीवर आपल्या उज्वल कारकिर्दीचा ठसा उमटवून असलेल्या श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानचा ४० “वर्धापन दिन” सोहळा रविवार दि.३१मार्च रोजी दुपारी ३.३० वा.अण्णाभाऊ साठे नाट्यगृह,राणीबाग,भायखळा मुंबई येथे संपन्न झाला.
समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.दत्ता मोरे होते.प्रमुख पाहुणे साहित्यिक व मा.सहाय्यक पोलिस आयुक्त श्री धनंजय वंजारी,नितीन बनकर संचालक मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, नाटककार भालचंद्र कुबल,अभय पैर इत्यादी उपस्थित होते.
२०२४ चा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले,समाज भूषण पुरस्कार माजी नगरसेवक सुनील मोरे,नाट्य गौरव पुरस्कार नाट्य सिने अभिनेते मिलिंद गवळी,अरुण मेहता,सुभाष नकाशे,पत्रकार समीक्षक संजय कुलकर्णी,निर्माता हरी पाटणकर यांना देण्यात आला.उद्योगरत्न किरण सेठ झोडगे,लोकशाहीर गौरव सुखदेव कांबळे,क्रीडा सुभाष अनभवने,पत्रकारिता यामिनी दळवी,समाजसेवा सदानंद चांदे,काव्य गौरव नंदकुमार सावंत,विघ्नहर्ता गौरव रमाकांत जाधव,अशोक सवने, तसेच समाज गौरव पुरस्कार जल फाउंडेशन कोकण विभाग व मराठा सामाजिक प्रतिष्ठान आदीना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान गेली ४० वर्षे नाट्यक्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत असताना अनेक नवोदित कलाकार घडवीत आहे.अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.