वनविभागाची गाडी तयार
चिपळूण:-जिल्ह्यातील शेती बागायतीसाठी उपद्रवी ठरत असलेली वानरे, माकडे यांना पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी वनविभागाकडून सर्व सोयींनी युक्त आणि हाताळण्यास, वाहतुकीस योग्य अशा स्वतंत्र पिंजऱ्याची निर्मिती केल्यानंतर वाहतुकीसाठी दोन गाड्याही उपलब्ध झाल्या आहेत. येत्या पंधरा दिवसात ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार माकड, वानर पकडण्याची मोहीम वनविभाग हाती घेणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
कोकणात आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस इत्यादी फळझाडे तसेच बांबू व फुलझाडे यांचा मोहोर, फुलोरा, पालवी इत्यादीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होण्याच्या घटना घडत असल्याने यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दोन वर्षांपूर्वी कोकणातील आमदारांनी सरकारचे लक्ष वेधल्यानंतर सरकारने एक अभ्यास गट नियुक्त केला. या अभ्यास गटाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सावताना वानर, माकडों निर्बिजीकरण करण्यी शिफारस केली होती. त्यानुसार आता माकड, वानर यों निर्बिजीकरण करण्याकरिता राज्य सरकारने प्रधान मुख्य वनसंरक्षक गुप्ता यांया अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याबरोबर आता जिल्हा वनविभागाने वानर, माकडांना पकडण्याची मोहीमही आखली आहे.
गेल्या जानेवारीमध्ये वनविभागाचे एक पथक जालना येथे जाऊन वानर माकड पकडण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून आलेले आहे. त्यानुसार जील्हतील उपद्रवी वानर-माकडे पकडण्यासाठी आवश्यक असलेला पिंजरे तयार करण्यात आलेले आहेत. या पिंजऱ्यांचे प्रात्यक्षिक दापोली तालुक्यातील मौजे केळशी येथे घेण्यात आले होते. चार पींजऱ्यांचे एक युनिट या पद्धतीने हा पिंजरा बनवलेला आहे. यामध्ये दोन पिंजरे जमिनीवर ठेवले जातात व एक पिंजरा बोलेरो पीकअपमध्ये ठेवला जातो व एक रॅम्प पिंजरा बोलेरो पीकअपमधील पिंजाऱ्यामध्ये वानर-माकड यांना घेण्यासाठी तयार केलेला आहे. जमिनीवरील पहिल्या पिंजऱ्यात वानर-माकडांसाठी खाद्य ठेवले जाते. त्याचा दरवाजा रस्सीच्या सहाय्याने उघड बंद केला जातो, खाद्याच्या अमिषाने वानर माकड पहिल्या पिंजऱ्यात आल्यानंतर पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला जातो. अशा प्रकारे बंदिस्त झालेले वानर-माकड पिंजरा क्रमांक 02मध्ये घेतले जाते व पिंजरा नंबर एकचा दरवाजा पुन्हा वानर माकड येण्यासाठी उघडला जातो, पिंजरा नंबर 02मध्ये बंदिस्त केलेले वानर माकड रॅम्प पिंजाऱ्याच्या सहाय्याने बोलेरो पिकअपमधील पिंजाऱ्यामध्य घेतले जाते. अशा प्रकारे एक-एक वानर- माकड बंदिस्त केले जाते. एका दिवशी साधारणता 40 ते 50 वानर-माकड पकड्याची क्षमता या पिंजऱयाची आहे.