रत्नागिरी:-संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ही गेली 6 वर्षे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संस्थेच्या रुग्ण मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णांची सेवा अविरतपणे करीत आहे, रत्नागिरी शहरा नजीक पोमेंडी येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पायाचे ऑपरेशन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाले.
आर्थिक परीस्थिती बेताची असल्याने त्यांनी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेकडे एक वॉकर देण्याची मागणी केली.संस्थेच्यावतीने या गरीब रुग्ण महिलेला वॉकर देण्यात आले.हा वॉकर त्या महिलेच्या मुलाने स्वीकारला.या वेळी संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे, कोऑर्डिनेटर सौ निकीता कांबळे उपस्थित होते.