रत्नागिरी:-शहरानजीकच्या कुवारबाव सिंचनभवन येथील रस्त्यावर प्रवासी बसच्या धडकेत पादचारी ठार झाल़ा. ही घटना सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. कमलेशकुमार बारातीलाल चौहान (25, ऱा उत्तरपदेश सध्या खेडशी रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े. याप्रकरणी बस चालकाविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
लिंगाप्पा माणीक बंदीछोडे (55, ऱा उमरगीर धाराशीव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिंगाप्पा हे 25 मार्च 2024 रोजी आपल्या ताब्यातील बस (एमएच 47 एएस 3465) घेवून रत्नागिरी ते कोल्हापूर असे जात होत़े रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कुवारबाव सिंचनभवन येथे रस्ता ओलांडणाऱया कमलेशकुमार चौहान याला लिंगाप्पा याच्या ताब्यातील बसची जोरदार धडक बसल़ी.
या अपघातात कमलेशकुमार यांचा मृत्यू झाल़ा अशी फिर्याद शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी दिल़ी त्यानुसार पोलिसानी लिंगाप्पा याच्याविरूद्ध भादंवि कलम 304 (अ), 279,337,338 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184,130 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा यापकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
रत्नागिरी कुवारबाव येथे बसच्या धडकेत पादचारी ठार
