रत्नागिरी:-तालुक्यातील गोळप येथे घरामध्ये वाद झाल्याने 14 वर्षीय मुलगा घरातून कुणालाही न सांगता निघून गेल्याचा प्रकार समोर आला आह़े. निरज कुमार राजेंद्र चौधरी (14, ऱा गोळप रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आह़े. याप्रकरणी त्याचे वडील राजेंद्र चौधरी यांनी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निरज याचा शिमग्यातील खाउसाठी दिलेल्या पैशावरून घरामध्ये वाद झाला होत़ा. या कारणातून 25 रोजी सायंकाळी निरज हा कुणाला काहीही न सांगता राहत्या घरातून निघून गेल़ा. निरज याला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत राजेंद्र चौधरी यांनी पुर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी. या घटनेचा पुढील तपास पुर्णगड पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
गोळप येथे घरात वाद झाल्याने 14 वर्षीय मुलगा गेला निघून
