खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील वेरळ-प्रभूवाडी येथील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंम्परच्या बॅटऱ्या लोखंडी पॅनल रॉड व नटबोल्ट काढून 16 हजार रूपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. त्यानुसार अज्ञातावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष चव्हाण (रा. वेरळ-प्रभूवाडी) यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या मालकाचा डंम्पर क्रमांक एम.एच. 014 जी.बी. 9548 हा रस्त्याच्या कडेला उभा करून ठेवण्यात आला होता. 26 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दोन बॅटऱ्या लंपास केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
खेडमध्ये उभ्या डंपरच्या बॅटऱ्याची चोरी
