खेड / प्रतिनिधी:-मुंबई-गोवा महामार्गावरील शिवफाटा येथे रस्ता ओलांडत असताना कारने दिलेल्या धडकेत 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. राजाराम गणपत काणेकर (रा. मोरवंडे-सुतारवाडी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
यापकरणी संदीप हरिश्चंद्र काणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय किशोर पवार (28 रा. पवारवाडी- चीपळूण) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय पवार हा आपल्या ताब्यातील एक्स.यु.व्ही. गाडी कमांक एम.एच 08 ए.एक्स. 3447 घेवून मुंबई ते चिपळूण जात असताना शिवफाटा येथे घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धास धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजाराम काणेकर यांचा मृत्यू झाला.
रस्ता ओलांडताना कारची धडक, 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
