चिपळूण:-करंजेश्वरी देवीचा शेरणे कार्यक्रमात पेठमाप येथील यात्रेदरम्यान 35 हजार रूपये किंमतीची गळयातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लंबवल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद कौस्तुभ भरत शिंदे (35, पाग उघडा मारुती, चिपळूण) यांनी दिली आहे. चिपळुणातील प्रसिध्द असणाऱ्या शेरणे कार्यक्रमात अनेक भाविक येत असल्याने सर्वाधिक गर्दी होते. असे असताना गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेत शिंदे यांच्या मुलीच्या गळ्यातील 6.280 ग्रॅम वजनी 35 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरुन नेली. हा प्रकार शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळुणात यात्रेदरम्यान गळ्यातील सोन्याची चैन लांबवली
