चिपळूण:- बेकायदा गावठी हातभट्टीसह देशी व गोवा बनावटीच्या दारु विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी येगाव, अलोरे-शिरगाव, गुढे या तीन ठिकाणी कारवाई केल्याची घटना मंगळवारी घडली.
पोलिसांनी त्याच्याकडील दारुसाठा जप्त केला असून याप्रकरणी तिघांवर सावर्डे, अलोरे-शिरगावसह चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्शुराम भागोजी महाडीक (येगाव), सचिन सिताराम खेतले (तळसर), जर्नादन जयराम उदेग (गुढे) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्शुराम महाडीक हा त्याच्या येगाव-वाणीवाडी येथे घराच्या पाठीमागील परिसरात हातभट्टीची गावठी दारु विकी करत होता. त्याच्याकडून 4 लिटर गावठी दारु व अन्य साहित्य असा 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिन खेतले हा अलोरे-शिरगाव बाजारपेठ देशी दारु विक्री करत होता. त्याच्याकडून 9 देशी दारुच्या बाटल्या असा 630 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जर्नादन उदेग हा गुढे येथे त्याच्या मालकीच्या जागेत गोवा बनावटीची दारु गैकायदा विक्री करत होता. त्याच्याकडून 3 हजार 388 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे.
चिपळुणात तीन ठिकाणी छापे, गोवा बनावटीची दारू जप्त
