रत्नागिरी:-तालुक्यातील निवळी बावनदी येथे मटका-जुगार चालविल्याप्रकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल़ा. बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करण्यात आल़ी. जयेंद्र बाबू कांबळे (ऱा पांगरी बौद्धवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आह़े. त्याच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य व 290 रूपयांची रोख रक्कम आढळून आल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवळी बावनदी येथे अवैध असलेला मटका-जुगार चालविला जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. 26 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास याठिकाणी पोलिसांकडून छापा टाकण्यात आल़ा. यावेळी संशयित आरोपी जयेंद्र कांबळे हा मटका-जुगार चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े. त्यानुसार पोलिसांनी जयेंद्र याच्याविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केल़ा.
बावनदी येथे मटका-जुगार चालविणाऱ्या पांगरीतील संशयितावर गुन्हा
