खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील तिसे येथील काळकाई मंदिराच्या शेजारी बेकायदेशीरपणे सुरू असलेले मटका जुगारावर येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांया नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून चौघांना रंगेहाथ पकडले. या धाडीत 23830 रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. दिलदार शाकीर हुसेल इराणीरा (रा. कराड-सातारा), मोहसीन मदार शेख (रा. हडपसर), यासीन बादशहा मुजावर (जामखंडी-बेळगाव), ईश्वर पभाकर हिरवे (रा. रावेल-जळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. हे चौघेजण तीनपत्त्यां द्वारे अंकांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळता पोलिसांना मिळाली. यावेळी पथक घटनास्थळी पोहाचले. धाडीत 8380 रूपये व इतर जुगारो साहित्य असा 23830 रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.