खेड / प्रतिनिधी:-कोकण रेल्वे मार्गावरील कोलाडनजीक नेत्रावती एक्सप्रेसच्या धडकेत विशाल बाळकृष्ण जाधव (30 रा. मौजे पाले खुर्द, कोलाड) याचा मृत्यू झाला. ऐन शिमगोत्सवात घडलेल्या घटनेने जाधव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या 16345 क्रमांकाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरूअनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेसची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह रूळावर आढळल्यानंतर गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार वरिष्ठ अधिका-यांनी कोलाड पोलीस स्थानकात कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहिते व सहकारी घटनास्थळी पोहून पंचनामा केला. या प्रकरणी कोलाड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास महिला पोलीस नाईक एन. ए. शिर्के करत आहेत.
कोलाडनजीक नेत्रावती एक्सप्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
