दापोली:-दापोली तालुक्यामधील पालगड धोंडी दुकान व दाभोळ भंडारवाडा येथे अवैध दारूसाठ्यांवर दापोली पोलिसांनी धाड टाकून दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पालगड धोंडी दुकान येथे अवैधरित्या दारू बाळगणारा सागर रमेश जाधव (32, पालगड-पवारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जाधव 25 रोजी 11.50 च्या सुमारास पालघड येथील धोंडी दुकानाच्या पाठीमागील भागात संशयितरित्या आढळला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ देशी दारूच्या 180 मि.ली. मापाच्या 12 सीलबंद बाटल्या आढळल्या. जाधव याने गैरकायदा बिगरपरवाना दारू बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत. 25 मार्च रोजी दुपारी 2.30च्या सुमारास दाभोळ खालचा भंडारवाडा येथील स्मशानभूमीजवळ समुद्रकिनारी झाडाझुडुपाच्या आडोशाला विकास नागेश तोडणकर (55, भंडारवाडा दाभोळ) हा संशयितरित्या आढळला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सुमारे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू कॅनसह आढळली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.
दापोलीत दोन ठिकाणी अवैध दारूसाठा जप्त, दोघांवर गुन्हा
