चिपळूण:-उन्हाच्या झळा वाढत असतानाच चिपळूण तालुक्यातील पाणीटंचाई वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात तालुक्यातील पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला होता.
गेल्या चार दिवसांत त्यामध्ये आणखी तीन गावांची भर पडली आहे.आगवे, अडरेसह अनारी गावांतही शुक्रवारपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. उन्हाचे चटके अधिक बसू लागल्यानंतर पाणीटंचाईही तीव्रपणे जाणवू लागली आहे. सोमवारी तालुक्यातील पहिला टँकर कोंडमळा धनगरवाडीत धावला. त्यानंतर कुडप, सावर्डे, कादवड येथील धनगरवाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जाऊ लागला. टेरव येथील ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार संपूर्ण गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आगवे-लिंबेवाडी, मधलीवाडी, अडरे धनगरवाडीत तर शुक्रवारी अनारी येथे प्रशासनाकडून पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे.
चिपळूण येथे टँकरने पाणी पुरवठा
