दापोली:-दापोली तालुक्यातील गावतळे येथे संदेश नारायण जाधव यांनी अवैधरीत्या गावठी दारूचा साठा जवळ बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावतळे येथून शेरवली कडे जाणाया पक्क्या रस्त्याच्या उजव्या बाजूस गावतळे हनुमान वाडी येथे छोट्या बंद टपरीच्या आडोशाला पत्राच्या शेडमध्ये संदेश जाधव हा संशयितरित्या आढळून आला.
त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सुमारे 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. जाधव याने आपल्या ताब्यात गैर कायदा व बिगर परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी दारू जवळ बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (इ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात शुभम रजपूत यांनी दिली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.