दापोली:-दापोली तालुक्यातील मुरुड येथे असणाऱ्या साई रिसॉर्ट मध्ये चोरट्याने डल्ला मारून सुमारे 1 लाख 2 हजार 800 रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरुड येथे साई रिसॉर्ट हे हॉटेल आहे . सदर हॉटेल बंद होते. या हॉटेलमध्ये डिसेंबर 2023 ते 18 मार्च 2024 दुपारी 12 वाजण्याच्या मुदतीत चोरी केली.
हॉटेलमध्ये कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन साई रिसॉर्ट मुरुडच्या इमारतीमध्ये रिसेप्शन हॉलच्या समोरील खोलीच्या गॅलरीमध्ये प्रवेश करून गॅलरीच्या स्लाइडिंगची खिडकी उचकटून रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. रिसॉर्टमधील 60 हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक सप्लायच्या रूम मधील सुमारे 3000 मीटर पीव्हीसी वायर तीस हजार रुपये किमतीचे एसी कनेक्शन करता वापरलेले 1700 फूट लांबीचे तांब्याचे पाईप , सहा हजार चारशे रुपये किमतीचे रिसॉर्ट मधील बाथरूम मध्ये बसविलेले सुमारे 16 नळ. 6 हजार 400 रुपये किमतीचे रिसॉर्ट मधील बाथरूम मध्ये बसविलेले सुमारे 16 शॉवर अज्ञात चोरट्याने लंपास केले . याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात रोहन अशोक केळसकर राहणार जालगाव महालक्ष्मी रोड यांनी दिली. दापोली पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादवी कलम 454 457 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.