चिपळूण:-शिमगोत्सवाकरिता कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली रोहा-चिपळूण मेमू गाडी आयत्या वेळी रद्द केली. त्यामुळे कोकणात शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
सध्या रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. चाकरमान्यांना पाच ते सहा तास गाडीची वाट बघावी लागत आहे. मात्र कोकणातील एकही लोकप्रतिनिधी चाकरमान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू असताना चाकरमान्यांना होणारा त्रास राजकीय पक्षाच्या अजेंड्याचा विषय नाही का, असा प्रश्न मतदार विचारत आहेत. रेल्वे सुरू करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी म्हटले आहे.