रत्नागिरी:-नाचणे येथील अपघातात जखमी झालेला हर्षल राजेंद्र ढेपसे (26, ऱा नाचणे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा. हर्षल याच्यावर मागील तीन महिन्यांपासून कोल्हापूर येथे उपचार करण्यात येत होत़े. नुकतेच त्याला गावी आणण्यात आले असता अचानक त्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड होवून पुन्हा कोल्हापूर येथे नेत असताना मृत्यू झाल़ा.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल याचा तीन महिन्यापूर्वी अपघात झाला होत़ा. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या हर्षल याला तातडीने कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े. नुकतेच त्याला कोल्हापूर येथील रूग्णालयातून घरी आणण्यात आले होत़े. सोमवारी सकाळी त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी पुन्हा कोल्हापूर येथे नेण्याचा निर्णय घेतल़ा. कोल्हापूर येथे नेत असताना हर्षल याचा मृत्यू झाल़ा.
अपघातात जखमी झालेल्या नाचणेतील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
